RAM काय आहे, त्याचे प्रकार आणि उपयोग काय काय आहेत?

काय तुम्हाला माहित आहे का RAM काय आहे ( What is RAM in MARATHI? ) , तुम्ही खूप वेळा हे ऐकलं असेल. जेव्हा तुम्ही Mobile किंवा Computer घ्यायला जाता तेव्हा नक्की विचारता की RAM किती GB आहे. जास्त RAM असेल तर Mobile किंवा Computer hang होत नाही किंवा slow होत नाही हे सर्व आज आपण  ह्या लेखात जाणून घेणार आहोत. शिवाय RAM चे किती प्रकार आहेत आणि त्याचे उपयोग काय काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

Computer Memory म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत?

संगणकामध्ये खूप Memory आहेत ज्याला आपण storage देखील म्हणतो,Computer ची Memory म्हणजेच जिथे आपण Data आणि Instruction store करून ठेवतो जेणेकरून जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा तो Data आपण Memory मधून काढू शकतो. (What is RAM in Computer)

संगणकाला कस कळत की कोणता Data आणि Instuction कुठे ठेवला आहे, ह्यासाठी Computer Memory ला छोट्या छोट्या भागात Devide करतो आणि त्याची  Size समान असते त्याला आपण Cell म्हणतो. 

प्रत्येक Cell चा एक पत्ता असतो त्याला Memory Address म्हणतात Computer ह्या पत्त्यावरून Data कुठे ठेवला आहे हे शोधतो.

तसे Computer मध्ये Memory चे तीन प्रकार असतात आणि त्याची वेगवेगळी कामे देखील आहेत.

 1. Primary Memory
 2. Secondary Memory
 3. Cache Memory

आपण ह्या लेखामध्ये Primary Memory  बद्दल जाणून घेणार आहोत. 

Primary Memory काय आहे

ह्या मेमरी ला Main Memory देखील संबोधले जाते. हि मेमरी तोच Data आणि Instruction ठेवते जो Data कॉम्पुटर वर्तमानात त्याचा उपयोग करतो. Data  तोपर्यंतच राहतो जोपर्यंत त्याला Power  मिळते. Power बंद झाल्यास डाटा स्वतः डिलिट होऊन जातो. Primary  Memory  चे पण दोन प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे :-

 1. RAM 
 2. ROM 

RAM म्हणजे काय? ( What is RAM in MARATHI? )  

RAM चा Full Form आहे Random Access Memory. ह्याला Direct Access Memory सुद्धा म्हणतात. RAM हा एक कॉम्पुटर Device मधील हार्डवेअर आहे जिथे ऑपरेटिंग सिस्टम (OS),अँप्लिकेशन प्रोग्रॅम्स आणि वर्तमान  वापरातील Data ठेवला जातो ज्यामुळे Device च्या प्रोसेसर द्वारे त्वरित पोहोचू शकतात. RAM हा एक Computer Hardware आहे जो इलेक्ट्रॉनिक device म्हणजेच Desktop Computers, Laptops ,tablets आणि Smartphones मध्ये असतो. 

RAM एक Volatile Memory असते म्हणजेच यातील Store Data कायमचा Store नसतो. जोपर्यंत RAM Power मिळते म्हणजेच Power Supply On राहते तोपर्यंत Data Store राहतो. Computer Shut down केल्यावर RAM मधील डाटा स्वतः डिलिट होऊन जातो. 

हेही वाचा : Motherboard काय आहे आणि कसे काम करतो?

Computer Hardware म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत?

ह्याला RANDOM ACCESS MEMORY (RAM) का म्हणतात 

RAM मध्ये Data आणि Instruction हा Cell मध्ये स्टोर असतो. प्रत्येक Cell हा Rows आणि Column  ने बनलेला असतो व त्याचा एक Unique Address  असतो, त्याला Cell Path देखील म्हणतात. कॉम्पुटर ह्या Cell मधून वेगवेगळा Data प्राप्त करू शकतो आणि तोही कोणत्याही Sequence शिवाय म्हणजेच RAM मधील डाटा हा Randomly Access केला जाऊ शकतो त्यामुळेच त्याला Random Access Memory  म्हणतात. 

RAM ची वैशिष्ट्ये काय काय आहेत (Characteristics of RAM in marathi)

जाणून घेऊया RAM ची वैशिष्ट्ये काय काय आहेत.

 1. Secondary Memory च्या तुलनेत RAM ची capacity कमी असते .
 2. Secondary Memory पेक्षा RAM ची स्पीड जास्त असते.
 3. RAM इतर Memory च्या तुलनेत महाग आहे.
 4. RAM ही एक Volatile Memory आहे.
 5. Power बंद झाल्यास memory मधील data डिलिट होतो.
 6. CPU मध्ये या memory चा वापर केला जातो.
 7. Computer मधील सर्व Programme,Applications, Instructions ह्या memory मध्ये चालतात. 

RAM चे 2 प्रकार आहेत

RAM चे देखील 2 प्रकार आहेत ते जाणून घेऊया

 1. Static RAM
 2. Dynamic RAM

Static RAM म्हणजे काय?

Static शब्दनेच समजते की स्थिर आहे म्हणजेच त्यामध्ये Data तोपर्यंत राहील जोपर्यंत त्याला power मिळत राहील. त्याला Spam देखील म्हणतात.

ह्याची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

 • ही खूप काळ चालते.
 • याला सारखे refresh करावे लागत नाही.
 • खूप जलद आहे.
 • याची size जास्त आहे.
 • महाग आहे
 • जास्त power लागते.

Dynamic RAM म्हणजे काय?

Dynamic म्हणजेच अस्थिर. प्रत्येक DRAM Cell मध्ये विद्युत capasitor मध्ये शुल्क किंवा अभाव असतो. Capasitor मधून होणाऱ्या गळतीची भरपाई करण्यासाठी हा डाटा प्रत्येक काही मिलीसेकंदमध्ये इलेक्ट्रॉनिक चार्जेसह सतत refresh केला जाणे आवश्यक आहे.

      ह्याची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

 • ही कमी काळ टिकते.
 • याला सारखे refresh करावे लागते.
 • खूप slow आहे.
 • ह्याची size कमी आहे.
 • स्वस्त आहे.
 • कमी power लागते.

ROM (Read only Memory) म्हणजे काय?

Read only Memory म्हणजेच शब्दानेच समजते की या मेमरी चा उपयोग फक्त वाचण्यासाठी होतो. यामध्ये माहिती पुसता किंवा बदलता येत नाही. कॉम्पुटर स्टार्ट केला की बुट स्टार्ट मध्ये ही memory वाचली जाते. संगणक बंद केला तरी ही माहिती पुसली जात नाही किंवा नष्ट होत नाही.

SDRAM आणि DDR RAM काय आहेत?

SDRAM चा फुल फॉर्म Synchronous dynamic random access memory आहे. SDRAM हा एक DRAM चा प्रकार आहे. जो की दुसऱ्या DRAM पेक्षा खूप fast आहे.

SDRAM स्वतःला computer च्या system clock सोबत synchronize करून घेते. म्हणूनच ती DRAM पेक्षा जलद आहे. SDRAM ची speed Megahertz मध्ये मोजली जाते. ती 133 MHz पर्यंत Systembus cycling ला support करते.

 • DDR2 RAM – DDR2 चा फुल फॉर्म double data rate2 असा आहे .DDR2 RAM प्रत्येक clock cycle मध्ये 4 words ला read किंवा write करते.
 • DDR3 RAM- DDR3 चा फुल फॉर्म double data rate3 असा आहे. याची स्पीड DDR2 पेक्षा double आहे. म्हणजेच प्रत्येक clock cycle मध्ये 8 words read किंवा write करते.
 • DDR4 RAM- DDR4 चा फुल फॉर्म double data rate 4 असा आहे. ही बाकी RAM च्या तुलनेत खूप फास्ट आहे.

Computer ची RAM आणि smart phone ची RAM मध्ये काय फरक आहे?

Computer मध्ये PCDDR आणि Mobile Phone मध्ये LPDDR चा उपयोग होतो.

 • PCDDR– standard double data synchronous RAM.
 • LPDDR – Low power double data synchronous RAM.

ह्या दोन्ही RAM एकमेकांच्या तुलनेत power मध्ये वेगवेगळ्या आहेत. Computer ची RAM ही performance वाढवण्यासाठी design केली जाते. तर Mobile ची RAM power save करण्यासाठी design केली जाते.

Mobile RAM ला ARM architecture चा उपयोग करून design केला जातो तर कॉम्पुटर RAM ला Intel x86 architecture चा उपयोग करून design करतात.

आपण काय शिकलो?

या पोस्टमध्ये आपण मेमरी म्हणजे काय,RAM के आहे,त्याचे किती प्रकार आणि उपयोग काय काय आहेत हे शिकलो.मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल.

FAQ

RAM चा फुल फॉर्म काय आहे?

RAM चा फुल फॉर्म- Random Access Memory असा आहे.

What is RAM and ROM?

RAM stands for random access memory, and ROM stands for read-only memory.

Leave a Comment

error: Content is protected !!