Motherboard काय आहे आणि तो कसे काम करतो?

नमस्कार मित्रांनो, आपण या लेखामध्ये Motherboard काय आहे आणि तो कसे काम करतो हे जाणून घेणार आहोत.मित्रांनो Motherboard हा संगणकाचा एक प्रमुख घटक आहे. त्याला Main Board,System Board, Main circuit Board आणि Logic Board असेही म्हणतात. Motherboard हा फक्त संगणकाचाच हिस्सा नसून वेगवेगळ्या electronic वस्तूंचा देखील हिस्सा आहे. त्याचप्रमाणे आपल्या Mobile, Tablet मध्ये देखील Motherboard असतो, त्याला आपण Logic Board म्हणतो.

जर आपण गेल्या दोन दशकांबद्दल जाणून घेतले तर Motherboard ने खूप अंतर पार केले आहे. जेव्हापासून संगणकाचा शोध लागला तेव्हापासून Motherboard हा त्याचा महत्वाचा भाग आहे. आधीच्या आणि आत्ताच्या Motherboard मध्ये भरपूर फरक आहे . जसे IBM ने बनवलेल्या पहिल्या PC मध्ये Motherboard वर फक्त प्रोसेसर आणि काही कार्ड स्लोट्स होते परंतु आजकाल Motherboard मध्ये बरेच बदल झालेले आहेत. म्हणूनच त्याचू क्षमता आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत Motherboard आणि त्याची कामे?तसेच Motherboard चे मुख्य भाग आणि त्याची कामे पण जाणून घेणार आहोत. चला तर मग प्रथम जाणून घेऊया Motherboard म्हणजे काय?

Motherboard म्हणजे काय? (What is Motherboard in Marathi?)

Motherboard हा एक संगणकाचा कणा आहे. तो संगणकात एक PCB (Printed Circuit Board) आहे जो की संगणकातील विविध घटकांना जोडून ठेवतो. जर आपण Motherboard बघितले तर तो एक हिरव्या रंगाचा Circuit Board दिसेल ज्यामध्ये अनेक उपकरणे असतील.

Motherboard शी जोडलेल्या काही महत्त्वाच्या उपकरणांमध्ये CPU, RAM, SMPS, Hard disk,Keyboard, Mouse, Monitor, USB device इत्यादींना जोडण्यासाठी कनेक्टर्स समाविष्ट असतात.सर्व उपकरणांना योग्य वीज पुरवठा करण्याचे काम Motherboard द्वारे केले जाते.

हेही वाचा: Computer Hardware म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती आहेत?

Motherboard ची काही मुख्य कामे (Functions of Motherboard)

Componants Hub (मध्य कणा)

Motherboard हा संगणकाचा कणा समाजाला जातो. कारण तो संगणकाच्या विविध उपकरणांना एकत्रित करून ठेवतो. तुम्ही बघितलेच असेल की संगणकामध्ये बाकीची उपकरणे Motherboard शी जोडलेली असतात.

विज पुरवठा करणे (Power Distribution)

संगणकाच्या विविध उपकरणामध्ये Motherboard power supply distribution च काम करते. सर्वात पहिले power supply (SMPS) च्या मदतीने विज Motherboard पर्यंत पोहोचते नंतर Motherboard आपल्याशी जोडलेल्या उपकरणांना योग्य त्या पद्धतीने power supply देतो.

डेटा प्रवाह नियंत्रित करणे (Data Flow)

Motherboard हा एक Communication Hub म्हणून काम करतो ज्याद्वारे बाकीची उपकरणे जोडलेली असतात. इथे बाकीच्या उपकरणांना योग्य पद्धतीने communication करण्यासाठी Motherboard control करतो. Motherboard हा Data Trafic ला नियंत्रित ठेवतो.

बाहेरील उपकरणांसाठी स्लॉट प्रदान करणे ( Slot for External Peripherals)

Motherboard कडे बाहेरील उपकरणांना जोडण्यासाठी अनेक स्लॉट असतात त्याच्या मदतीने तो अनेक उपकरणांना जोडून ठेवतो.

BIOS

संगणकाला चालू करण्यासाठी , boot up करण्यासाठी BIOS च्या मदतीने Read Only Memory ला store करून ठेवतो. ह्याने अस समजत की Motherboard च्या मदतीने संगणक चालू होतो.

Motherboard चे प्रकार ( Types of Motherboard in Marathi)

Motherboard च्या विकासासह,Motherboard ची क्षमता आणि आकारातही बदल झालेला आहे. आपल्याकडे विविध प्रकारचे Motherboard उपलब्द आहेत आणि ते सर्व वेगवेगळे आहेत. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया.

AT Motherboard

AT म्हणजे Advance Technology. AT Motherboard चे नाव संगणकात वापरल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या Motherboard मध्ये येते. ह्या Motherboard ची लांबी 351mm आणि रुंदी 305 mm इतकी होती. ह्यामध्ये प्रत्येकी 6 पिनचे दोन पॉवर कनेक्टर असायचे.

हा Motherboard 1980 च्या दशकात IBM ने बनवला होता. त्यानंतर जवळजवळ दोन दशकंपर्यंत, AT Motherboard आणि बेबी AT संगणक बाजारात चांगली पकड राखून होते. परंतु 1997 नंतर ATX Motherboard मुळे AT Motherboard दडपला गेला.

ATX Motherboard

1997 नंतर जवळजवळ 1990 च्या दशकात Intel ने ATX Motherboard ( Advance Technology Extended) सादर केले होते. जुन्या Motherboard पेक्षा ATX हा आकाराने लहान होता. त्याची लांबी 305 mm तर रुंदी 204 mm इतकी होती. ह्या Motherboard मध्ये Advance Control ची सुविधा होती.

मागील प्लेट्समध्ये keyboard कनेक्टर्स जोडले गेले आणि विविध Addons साठी स्लोट्स देण्यात आले. शिवाय BIOS programme च्या साहाय्याने power management केली जाऊ शकत होती. वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे आजही ATX चा वापर केला जातो. ATX च्या कुटुंबामध्ये Full ATX, Flex ATX, Micro ATX चा समावेश आहे.

Mini ITX Motherboard

या प्रकारच्या Motherboard चा उपयोग Small Form Factor च्या Computer System मध्ये केला जातो. Mini ITX Motherboard 6.7 x 6.7 इंच एवढा आहे. हे 2001 मध्ये XIA Technology द्वारे बनवले गेले होते. हे आकाराने लहान असल्याने Fan cooling कमी लागते त्यामुळे ते कमीत कमी विज वापरते. हे लहान आकाराच्या संगणकामध्ये वापरले जाते.

याशिवाय बऱ्याच प्रकारचे Motherboard आहेत परंतु वर नमूद केलेला Motherboard सध्या जास्त वापरला जातो.आता आपण Motherboard मध्ये असलेल्या काही महत्वपूर्ण भागांची नावे व त्यांची कामे जाणून घेऊया.

Motherboard चे काही मुख्य भाग व त्यांची कामे 

CPU Socket

Motherboard चे एक अतिशय महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला एक CPU Socket असतो जो की CPU (Central Processing युनिट) ला म्हणजेच computer च्या brain ला फिट केला जातो. वेगवेगळ्या Motherboards मध्ये वेगवेगळ्या पिन्स असतात. त्यामुळे माहीत पडते की ह्या Motherboard मध्ये कोणत्या model चा processor फिट होईल.

RAM Slot

आपण कोणत्या प्रकारचा Motherboard वापरतो आहे त्यावरून आपण त्यात किती size चा आणि कोणत्या प्रकारचा RAM ते ठरवू शकतो. साधारणतः RAM हा बोर्ड अनुसार लिमिटेड असतो की त्याला किती size चा RAM support करेल.

Power Connector

हा 20-24 pin चा एक Power Connector असतो जो SMPS ( Switch mode power supply) ला Motherboard शी कनेक्ट करतो आणि ह्याद्वारे बाकीच्या उपकरणांना योग्य तेवढी विज पुरवली जाते.

BUS

BUS द्वारे कोणत्याही सर्किटमधील घटक दुसऱ्याशी जोडला जातो. BUS ची speed MHz (Mega Hertz) द्वारे मोजली जाते. त्याच्या स्पीड नेच माहिती पडते की कोणत्याही BUS ने किती Data transfer केला जातो.

North Bridge Chipset

हा एक Micro chip आहे जो की सरळ CPU सोबत जोडलेला असतो. ह्याचे काम RAM ,Harddisk आणि PCI devices ला manage करायचे आहे.

South Bridge Chipset

ही एक IC Chip आहे. जी north bridge सोबत जोडलेली असते. ती संगणकामध्ये होणाऱ्या Input / Output Functions ना control करते.

CMOS Battery

ह्याचा फुल फॉर्म आहे , Complimentary Mental Oxide Semi conductor. ह्यामध्ये date, time आणि hardware setting सारखी information store केली जाते.

Expansion card slot / PCI Slot

Motherboard वरील स्लॉट जेथे आपण अतिरिक्त (extra) कार्ड लावू शकतो. जसे ग्राफिक कार्ड, ऑडिओ कार्ड,नेटवर्क कार्ड,मॉडेम कार्ड.

हळूहळू Motherboard अधिक चांगले आणि वेगवान होत आहे,त्याची किंमत देखील कमी होत आहे. जसजसे जग बदलत आहे ,तश्या लोकांच्या गरजा देखील बदलत आहेत, म्हणूनच Motherboard चा आकार तयाची गती यातदेखील बदल होत आहे.

आपण काय शिकलो?

या पोस्टमध्ये आपण Motherboard काय आहे,त्याची कामे, प्रकार आणि त्याची काही प्रमुख भाग याची माहिती घेतली. मी अशी अपेक्षा करतो की या बद्दल तुम्हाला सर्व माहिती समजली असेल.

Leave a Comment

error: Content is protected !!