उद्योगिनी योजना, महिलांना मिळणार रुपये ३ लाख पर्यंत कर्ज

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

नेहमी प्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन योजना उद्योगिनी योजना महाराष्ट्र खास करून महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी. 

ज्या महिलांना काहीतरी व्यवसाय सुरु करायचंय, घरबसल्या काही income मिळवायचंय पण तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर मग आता तुम्हाला tension घ्यायची काहीच गरज नाहीये. दरवर्षी आपल्या राज्यात केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार यांच्याकडून नवनवीन योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना आपल्या सरकारने खास महिलांसाठी आयोजित केली आहे जिचं नाव आहे उद्योगिनी योजना. एकूण ८० असे उद्योग आहेत ज्यासाठी आपल्या देशातील सरकार तुम्हाला loan provide करते आणि त्याचबरोबर तुम्हाला ३०% subsidy देखील मिळणार आहे. भारत शासना अंतर्गत महिला विकास महामंडळ तर्फे हि योजना जरी करण्यात आलेली आहे.  

चला तर मग बघूया काय आहे उद्योगिनी योजना 2024? त्यासाठी कोण कोण पात्र आहे? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे? आणि कोणाला मिळणार ३ लाख रुपये?

उद्योगिनी योजना म्हणजे काय? । What is Udyogini Yojana?

उद्योगिनी योजना हि एक अशी योजना आहे जी उद्योजिका महिलांना सर्वात स्वस्त loan आणि उद्योगाचं training देखील देते. या योजने अंतर्गत महिलांना सरकारी आणि खासगी बँकांद्वारे loan आणि गरज पडली तर व्यवसायाचं प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे . 

आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार यांचा देशामध्ये जास्तीत जास्त व्यवसाय असण्याला आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याकरिता नेहमीच पाठिंबा आहे. याच हेतूने मोदी सरकार द्वारा २०२० मध्ये उद्योगिनी योजना राबविण्यात आलेली आहे.  व्यावसायिक महिला या योजने मार्फत ८८ प्रकारचे लघु उद्योग सुरु करू शकतात. 

उद्योगिनी योजना पात्रता व अटी । Udyogini Yojana Elegibility & Rules 

या योजने अंतर्गत Udyogini loan मिळवणे खूप सोपे आहे. या योजनेतील पात्रता व अटी यासाठी बनवलेल्या आहेत कि जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना औद्योगिक loan मिळू शकेल आणि त्यांना त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरु करता येईल. 

१) उद्योगिनी योजना अंतर्गत त्याच महिलांना कर्ज मिळू शकेल, ज्या महिलांचा व्यवसाय या योजने अंतर्गत registered आहे. 

२) अर्जदार फक्त महिला असली पाहिजे. महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. 

३) ज्या महिलांचे वय १८ ते ५५ वर्ष आहे त्याच महिला या योजनेसाठी पात्र आहेत. 

४) या योजनेचा लाभ घेणारी अर्जदार महिलेचा कौटुंबिक उत्पन्न १ लाख ५० हजार पेक्षा जास्त नसणे गरजेचे आहे.

५) विधवा आणि विकलांग महिलांसाठी वार्षिक उत्पन्नाची कोणतीही अट नाही. म्हणजेच त्यांचं एकूण वार्षिक उत्पन्न कितीही असेल तरीही त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. 

६) या योजने अंतर्गत विधवा आणि विकलांग महिला तसेच SC ST महिलांना व्याजमुक्त कर्ज देखील मिळू शकते. 

हेही वाचा:-

उद्योगिनी योजना लाभ । Udyogini Yojana Benifits

१) उद्योगिनी योजना या योजने अंतर्गत जास्तीत जास्त ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. 

२)  कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर ३०% अनुदान दिले जाते. 

३) या योजनेचा लाभ घेणारी महिला हि ८८ प्रकारचे लघु व्यवसाय सुरु करू शकते. 

४) उद्योगिनी योजना या योजने अंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर देखील खूप कमी आहे. परंतु व्याजदर बँकेच्या अधिकारी मार्फत ठरविण्यात येणार आहे.  

५) अर्जदार महिलेने जर यापूर्वी कोणत्याही कारणास्तव loan घेतलं असेल व ते परतफेडू शकली नसेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

उद्योगिनी योजना आवश्यक कागदपत्र । Udyogini Yojana Documents Required

उद्योगिनी योजनेसाठी अर्जासोबत द्यावी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे. 

  • रहिवासी दाखला 
  • उत्पनाचा दाखला 
  • जन्माचा दाखला 
  • आधार कार्ड 
  • बँक खाते पासबुक 
  • दोन पासपोर्ट साईझ फोटो 
  • दारिद्रय रेषेखालील महिला असल्यास रेशन कार्डची प्रत 

वरील सर्व कगादपत्रे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे . आता आपण बघूया उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कसा भरायचा ? 

या योजनेसाठी तुम्ही online किंवा offline दिन्ही प्रकार्रे अर्ज भरू शकता.  जर तुम्हाला offline अर्ज भरायचा असेल तर आपल्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन तुम्हाला या उद्योगिनी योजना फॉर्म घ्यावा लागेल. तो फॉर्म व्यवस्थित वाचून भरून आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडून त्या बँकेतच जमा करायचा आहे.  तसेच खाजगी वित्तीय संस्थांमधून देखील तुम्ही अर्ज भरू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला online अर्ज भरायचा असेल तर बँकेच्या website वॉर जाऊन तिथून देखील तुम्ही या योजनेचा form भरू शकता. त्यानंतर तुम्हाला एक mail येतो त्यानंतर तुम्ही loan घेऊ शकता. 

Detail  मध्ये सर्व माहिती तुम्हाला या लेखात दिलेली आहे तरीही देखील तुमचे काही प्रश्न असतील तर comments मध्ये टाकायला विसरू नका तुम्हाला आवश्यक उत्तरे देण्यास आम्ही नक्कीच उपस्थित राहू. 

धन्यवाद… 

उद्योगिनी योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये 

या योजनेअंतर्गत अर्जदारास कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागणार नाही म्हणजेच महिलांना व्यवसायासाठी लागणारे कर्ज मिळविण्याकरिता कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागणार नाही. 

व्याज दर :  या योजनेसाठी मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर खूप कमी आहे. तो ८ % ते १२ % च्या मधला असेल परंतु तो नक्की किती असेल हे बँकेचे मुख्य अधिकारी निश्चित करतील. 

विधवा आणि विकलांग महिला यांना उद्योगिनी योजनेची processing fees आकारली जाणार नाही. 

FAQ ( Frequently Ask Questions)

मला home tution चालू करायचंय तर मला loan मिळू शकेल का?

हो नक्की मिळेल सरकारने दिलेल्या ८८ लघु उद्योगांपैकी हा सुद्धा एक छोटा व्यवसाय आहे.

Loan ची amount कुठे जमा होणार?

या योजनेसाठी अर्ज भरताना तुम्ही ज्या बँकेच्या details दिलेल्या आहेत त्या बँकेच्या खात्यावर तुमची loan ची रक्कम जमा होईल.

या योजनेची माहिती कोणत्या website वर available आहे?

Udyogini.org या वेबसाईट वर तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती मिळेल. 

Leave a Comment

error: Content is protected !!