FASTag म्हणजे काय आणि ते कसे काम करते, जाणून घ्या!

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण FASTag काय आहे आणि ते कसे काम करते, ह्याची सुरुवात कधी आणि कशी झाली याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

FASTag

तुमच्याकडे जर चार चाकी गाडी असेल तर तुम्ही नक्कीच FASTag बद्दल ऐकलं असेल. टोल नाक्यावर वर वाढती गर्दी पाहता, टोल साठी लांब लांब लागणाऱ्या रांगा बघून भारत सरकार द्वारे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) FASTag बंधनकारक केल. ह्याच्या वापरामुळे वाहनांना टोल नाक्यांवर जास्त वेळ न थांबता मनुष्य बळाचा वापर न करता इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे टोल भरता येत. चला तर मग जाणून घेऊया फास्टॅग काय आहे.

FASTag काय आहे? । What is FASTag

Fastag हा एक इलेक्ट्रॉनिक टॅग आहे जी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानावर आधारित आहे. फास्टॅग हा वाहनांच्या विंडस्क्रीन वर बसवले जाते. ह्याची सुरुवात भारत सरकार द्वारे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ह्या संस्थेद्वारे झाली.

मुख्यतः देशातील प्रदूषण वाढत आहे आणि त्यामागे टोल प्लाझा वरील गर्दी हि त्यामागील मुख्य कारण आहे आणि फास्टॅग मुळे महामार्गावर टोल भरण्यासाठी लांब रांगेत उभे राहणे आणि इंधनाचा अपव्यय यापासून वाहनांची सुटका झाली.

FASTag कसे काम करते?

फास्टॅग असलेल्या वाहनांना टोल नाक्यांवर तात्काळत थांबण्याची गरज नसते कारण रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) द्वारे वाहन पुढे जात असताना त्यांच्या त्या फास्टॅग च्या प्रीपेड खात्यातून पैसे ऑटोमॅटिकली वजा केले जाते. त्यामुळे त्यांना टोल भरण्यासाठी गाडी थांबवण्याची गरज भासत नाही.

फास्टॅग मधील RFID कोड हा १३ अंकी असतो जो कि GS१ इंडिया कडून दिला जातो. GS१ इंडिया हि एक अशी संस्था आहे जी जागतिक मानकांनुसार उत्पादनाची अचूक ओळख करण्यासाठी युनिक कोड देते. आणि RFID टेकनॉलॉजि हि त्यातील बारकोड कॅप्चर करण्याचं काम करते.

FASTag का आवश्यक आहे?

आपल्याकडे जर चारचाकी गाडी असेल तर फास्टॅग त्या वाहनांसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२१ च्या मध्यरात्री पासून अनिवार्य केलं आहे. आणि जर ज्या वाहनांना फास्टॅग नसेल त्यांच्याकडून दुप्पट टोल आकाराला जातो.

FASTag कुठून खरेदी करायचा? । Where to Buy Fastag?

फास्टॅग देशातील २३ बँका आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे खरेदी करू शकता. याच बरोबर आरटीओ (RTO) कार्यालय, सर्व सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवरही फास्टॅग उपलब्ध आहेत.

किंवा तुम्ही “My FASTag” ऑफिसिअल अँप वर जाऊन तेथे रेजिस्ट्रेशन करून ऑनलाईन ऑर्डर करू शकता. येथून खरेदी केल्यानंतरफास्टॅग तुमच्या घराच्या किंवा ऑफिस च्या पत्त्यावर पाठवण्यात येतो.

फास्टॅग साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

फास्टॅग साठी अर्ज करताना वाहन चालकाला खाली दिलेल्या कागदपत्रांची आवश्यकता असते:

  • फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला वाहन मालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आरसी बुक
  • KYC डोकमेंट्स: आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा मतदार कार्ड यापैकी कोणतेही एक.
  • फास्टॅग ५ वर्ष वर्ष वैध असेल.

तुम्ही कोणत्याही PoS (पॉइंट ऑफ सेलवर जाऊन फास्टॅग साठी अर्ज केल्यासत्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जा  (मूळ देखील घेऊन जा, ओरिजिनल वेरिफिकेशन साठी) आणि जर तुम्ही ऑनलाइन अर्ज करत असाल तर त्यांचा ओरिजिनल फोटोच अपलोड करा.

फास्टॅग वापरण्याचे काय फायदे आहेत । Benefits of FASTag

फास्टॅग वापरण्याचे खूप सारे फायदे आहेत, काय आहेत ते जाऊन घ्या:

  • फास्ट टोल पेमेंट: फास्टॅग यंत्रणा येण्या अगोदर टोल भरण्यासाठी वाहनांना टोल लेनवर खूप वेळ थांबावे लागत होते कारण तेव्हा रोख स्वरूपात पेमेंट करावे लागत असे, पण आता इलेकट्रोनिकली कॅशलेस पेमेंट झाल्यामुळे पेमेंट फास्ट होते आणि वाहतूक कोंडी हि कमी होते.
  • इंधन बचत: पेमेंट प्रोसेस फास्ट झाल्यामुळे वाहनांना जास्त वेळ टोल लेनवर थांबण्याची गरज भासत नाही त्यामुळे इंधनाची देखील बचत होते.
  • कमी प्रदूषण: इंधनाची बचत झाल्यामुळे वायू प्रदूषण हि कमी होते आणि गर्दीमुळे होणारा ध्वनी प्रदूषण आणि कॅशलेस असल्यामुळे कागदाचा वापरही होत नाही त्यामुळे पर्यावणाला फायदा होतो.
  • ऑनलाइन रिचार्जची सुविधा: तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे घरी बसून “My FASTag” ऑफिसिअल अँप द्वारे ऑनलाइन रिचार्ज सहज करू शकता.
  • सामाजिक लाभ – फास्टॅग चा वापर केल्याने टोल लेनवर जास्त वेळ थांबावे लागत नाही आणि महामार्गाचे व्यवस्थापन अधिक चांगले करता येते.

FAQs: फास्टॅग बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

काचेवर FASTag कुठे लावायचा

वाहनाच्या पुढील आरशाच्या आतील बाजूस विंडस्क्रीन फास्टॅग बसवले जातेते बसवण्याची योग्य जागा आरशाच्या मध्यभागी आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!