मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती | Makar Sankranti Information In Marathi

मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या लेखात मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांत हा नवीन वर्षाचा पहिलाच सण आणि उत्तरायणातील प्रमुख भारतीय सण आहे. मकर संक्रात (Makar Sankranti) हा भारतातील एक प्रमुख सण आहे. दरवर्षी हा सण १४ किंवा १५ जानेवारी ला साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रातीनंतर दिवस मोठे आणि रात्र लहान होत जातात.

अनुक्रमणिका

मकर संक्रांत हा एक हिंदू सण आहे. विशेष म्हणजे हा सण भारतात आणि नेपाळ च्या विविध भागांमध्ये साजरा केला जातो. केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात ह्याला संक्रांती म्हणून ओळखतात तर तामिळनाडू मध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो. चला तर मग आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीबद्दल आणि त्याच्या महत्वाबद्दल.

मकर संक्रांती बद्दल पौराणिक माहिती

हिंदू पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेव आपले पुत्र शनी देव ह्यांना भेटायला जातात आणि त्यामुळेच शनी देव मकर राशीचे प्रतीक मानले जातात. आई-वडील आणि मुलगा ह्यांच्यात कितीही मतभेद असूनही यांच्यातल्या सकारात्मक बंध लक्षात ठेवण्यासाठी मकर संक्रांतीला महत्व देण्यात आले आहे. आणि तसेच महाभारतामध्ये भीष्म पिताम्याने धन त्यागासाठी ह्याच दिवससची निवड केली होती. ह्याच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या पूजनाचे विधान आहे तसेच श्री गणेश, भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी चेही पूजन ह्या दिवशी केले जाते.

मकर संक्रांतीबद्दल अशी पण एक समजूत आहे कि देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते जसे कधी हत्ती, गाढव, डुक्कर. मात्र त्या मागे त्याचा खरा अर्थ काय आहे हे स्पष्ट नाही आहे.

मकर संक्रांतीचे महत्व काय आहे? । What is Significance of Makar Sankranti

आपला भारत देश का एक कृषिप्रधान देश असल्यामुळे त्या संबंधित अनेक सण-उत्सव, समारंभ साजरे केले जातात आणि शेतकऱ्यांसाठी संक्रांत हा सण खूप महत्वाचा आहे कारण त्या दिवसांपासून शेतकरी पिकांच्या कापणीला सुरुवात करतात. या दिवशी स्त्रिया शेतात आणि मळ्यांमध्ये एकमेकांना वाण देऊन तसेच देवाला सुपडात हरबरे, बोरे, तिळगुळ, ऊस अर्पण करून सण साजरा करतात.

या दिवशी दान केल्याने त्या व्यक्तीला त्याचे खूप लाभ मिळतात म्हणून या दिवशी दान-दक्षिणा चे खूप महत्व आहे. या दिवशी गंगा स्नान केल्याने देखील पुण्य प्राप्त होते असे मानतात.

मकर संक्रांतीला बनवले जाणारे पदार्थ | Makar Sankranti Special Foods

मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी असते. या दिवशी विविध भाज्यांची मिळून एकत्रित भाजी बनवली जाते. तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते. घरातील सर्वजण बाजरीची भाकरी व मिक्स भाजी आवडीने खातात.

मकर संक्रांतीच्या दिवशी स्वयंपाकात पुरणपोळीचा बेत देखील केला जातो. सर्वजण एकमेकांना “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” असे म्हणत तिळगुळ वाटतात. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू समारंभ देखील ठेवतात. या दिवशी लोक पतंग उडवण्याचा हि आनंद घेतात.

तसेच इतर राज्यात तामिळनाडू मध्ये हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो तिथे तांदूळ, दूध, गूळ, तूप, आणि वेलची टाकून तांदळाची खीर बनवली जाते. गुजरात मध्ये उंधियु बनवले जाते आणि पंजाब मध्ये सरसो दा साग आणि मक्के दि रोटी बनवली जाते. अश्या प्रकारे वेगवेगळ्या राज्यात वेग वेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो.

भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये संक्रांती कशी साजरी केली जाते?

भारतातील प्रत्येक राज्यात मकर संक्रांत मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि विविध नावे आणि प्रथांनुसार पाळली जाते.

  • महाराष्ट्रात संक्रांत ३ दिवस साजरी केली जाते. पहिल्या दिवशी म्हणजेच संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात. हा सण सर्वांना नवीन उत्साह आणि आनंद देतो.
  • हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब अश्या उत्तर भारतात हा दिवस लोहरी (Lohri) म्हणून साजरा करतात.
  • केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेशांत संक्रांति आणि तामिळनाडू अश्या दक्षिण भारतात पोंगल (Pongal) म्हणून साजरा करतात.
  • गुजरात आणि राजस्थान मध्ये उत्तरायण म्हणून साजरा करतात. या दिवशी तिथे खूप मोठ्या प्रमाणात पतंग देखील उडवण्यात येते.
  • बिहार मध्ये संक्रान्ति तर ओरिसा आणि पश्चिम बंगाल मध्ये मकर संक्रान्ति तसेच आसाम मध्ये भोगाली बिहू (Bhogali Bihu) म्हणून साजरा करतात.

अश्या प्रकारे मकर संक्रांत वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते.

परदेशातील मकर संक्रांतीच्या उत्सवांची नावे

भारताबाहेर देखील मकर संक्रांती खूप उत्साहात साजरी करतात.

  • नेपाळ मध्ये थारु लोक माघी तसेच इतर भागात माघ संक्रांति (Maghe Sankranti) साजरी करतात.
  • थायलंड मध्ये सोंग्क्रान (Songkran)
  • लाओस मध्ये पि मा लाओ (Pi Ma Lao)
  • म्यानमार – थिंगयान (Thingyan)

पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांतीला घालायचा पोशाख

भारतात लोक मकर संक्रांति च्या दिवशी वेगवेगळे पारंपरिक पोशाख घालण्यास उत्सुक असतात. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या चालीरीती नुसार लोक कपडे घालतात.

  • महाराष्ट्रात स्त्रिया पारंपरिक नववारी साडी जसे नववारी आणि पुरुष कुर्ता पैजामा घालतात. ह्या दिवशी बहुतेक लोक महाराष्ट्रात काळी वस्त्रे घालण्यावर भर देतात जसे स्त्रिया काळी साडी आणि पुरुष काळा कुर्ता आणि पैजामा घालतात. तसेच नववधू हलव्याचे दागिने सुद्धा घालतात. तसेच लहान मुलांना देखील हलव्याचे दागिने घानून बोरन्हाण घालतात.
  • गुजरात मध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघेही रंगबेरंगी कपडे घालतात. स्त्रिया घागरा चोळी आणि पुरुष धोती कुर्ता घालतात.
  • तामिळनाडू मध्ये स्त्रिया जरीच्या वर्क च्या रेशमी साड्या आणि पुरुष पारंपरिक वेष्टी (धोती) आणि अंगवस्त्रम घालण्यास पसंती देतात.
  • बिहार आणि झारखंडमधील महिला भागलपुरी सिल्क किंवा कॉटनच्या साड्या आणि पुरुष धोती-कुर्ता किंवा कुर्ता-पायजमा ला पसंती देतात.
  • पश्चिम बंगाल मध्ये लोक पारंपारिक बंगाली पोशाख म्हणजेच स्त्रिया टॅंट साड्यांसारख्या साड्या निवडतात आणि पुरुष धोतर आणि कुर्ता किंवा पारंपारिक बंगाली पोशाख परिधान करतात
  • आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये स्त्रिया कांजीवरम किंवा पोचमपल्ली यांसारख्या साड्या घालणे पसंत करतात. तर पुरुष त्यांच्या प्रदेशासाठी धोती-कुर्ता किंवा पारंपारिक पोशाख घालणे पसंत करतात.
  • पंजाबमध्ये लोहरी ला महिला चमकदार आणि रंगीत पंजाबी सूट किंवा सलवार कमीज परिधान करतात त्याच बरोबर, पुरुष पारंपारिक फुलकरी भरतकामाने सुशोभित कुर्ता-पायजमा किंवा पारंपारिक पंजाबी पोशाख परिधान करतात.
  • आसाम मध्ये स्त्रिया मेखेला चादोर, पारंपारिक दोन-पीस पोशाख घालतात. पुरुष धोती आणि कुर्ता किंवा गामोसा म्हणून ओळखला जाणारा पारंपारिक आसामी पोशाख घालतात.

अश्या प्रकारे प्रत्येक प्रातांत लोक पारंपरिक पोशाख घालून हा सण साजरा करतात.

तर मित्रांनो आपण ह्या लेखात मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती, पौराणिक माहिती, महत्व व इतर माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला हि पोस्ट आवडल्यास मित्रांना जरूर Share करा आणि comment मध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर द्या.

धन्यवाद..!

FAQs about Makar Sankranti

मकर संक्रांत हा सण कोणत्या ऋतूत येतो?

हा सण हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीत येतो.

मकर संक्रांतीचे महत्व काय आहे?

या दिवशी दान केल्याने त्या व्यक्तीला त्याचे खूप लाभ मिळतात म्हणून या दिवशी दान-दक्षिणा चे खूप महत्व आहे.

मकर संक्रांत का करतात?

या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रातीनंतर दिवस मोठे आणि रात्र लहान होत जातात. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेव आपले पुत्र शनी देव ह्यांना भेटायला जातात आणि त्यामुळेच शनी देव मकर राशीचे प्रतीक मानले जातात. आई-वडील आणि मुलगा ह्यांच्यात कितीही मतभेद असूनही यांच्यातल्या सकारात्मक बंध लक्षात ठेवण्यासाठी मकर संक्रांतीला महत्व देण्यात आले आहे.


मकर संक्रांतीला कोणता रंग घालायचा?

मकर संक्रांतीला शक्यतो काळा रंगाचा पोशाख घालतात. पण प्रत्येक वर्षी त्याची संकल्पना वेगवेगळी असते.

भारतात मकर संक्रांत कशी साजरी केली जाते?

भारतात मकर संक्रांत प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात. महाराष्ट्रात तिळगुळ देऊन आणि पतंग उडवून साजरी करतात.


हलव्याचे दागिने का घालतात?

एरवी महिला सोन्याच्या दागिन्यांवर भर देतात पण मकर संक्रांति ला हलव्याचे दागिने घालण्याची पद्धत आहे. नवविवाहित जोडपे हे हलव्याचे दागिने घालतात तर नवजात बालकांना हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालतात.


संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे का घालतात?

हिंदू पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेव आपले पुत्र शनी देव ह्यांना भेटायला जातात आणि त्यामुळेच शनी देव मकर राशीचे प्रतीक मानले जातात. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रातीनंतर दिवस मोठे आणि रात्र लहान होत जातात. म्हणून आधीच्या मोठ्या रात्रीला निरोप देण्यासाठी काळे कपडे घालतात.

Leave a Comment

error: Content is protected !!