लेक लाडकी योजना महाराष्ट्र | Lek Ladki Yojana Maharashtra 2023

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात सरकार बऱ्याच योजना राबवते त्यापैकी हि एक लेक लाडकी योजना (Lek Ladki yojana 2023 Maharashtra) खास मुलीना सक्षम बनविण्यासाठी  सरकारने आमलात आणली आहे. या योजनेमध्ये मुलींना मिळणार आहेत १ लाख १ हजार रुपये परंतु हि रक्कम कशी मिळणार आहे, कोणत्या मुलींना मिळणार आहे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे सर्व तुम्हाला जाणून घ्यायचं असल्यास तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचणे गरजेचे आहे. 

लेक लाडकी योजनेचा उद्देश काय आहे? | Lek Ladki Yojana Objectives

मित्रांनो, राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी मंत्रिमंडळात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत अनेक राज्याचे नेतेमंडळी उपस्थित होते. त्याच बैठकीत आपल्या राज्यातील गरीब कुटुंबातील मुलीना शिक्षण घेण्यास व त्याना सक्षम बनविण्यासाठी आर्थिक मदत म्हणून लेक लाडकी योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आहे. या योजनेत मुलींना १ लाख १ हजार रुपये इतकी रक्कम देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे . परंतु त्यासाठी सरकारने काही नियम व अटि देखील घालून दिल्या आहेत . या लेखात आपण आता बघणार आहोत कि या अटी आणि नियम नक्की काय आहेत आणि या योजनेसाठी कोण पात्र आहे. 

लेक लाडकी योजना अटी व नियम | Lek Ladki Yojana Conditions

१) मुलीचा जन्म झाल्यावर तिला रुपये ५००० इतकी रक्कम मिळणार आहे. 

२) मुलगी इयत्ता पाहिलीत गेल्यावर तिला ६००० रुपये मिळणार आहेत. 

३) ती मुलगी सहावीत गेल्यावर तिला मिळणार आहेत रुपये ७०००

४) त्यानंतर  जेव्हा ती मुलगी इयत्ता ११ वीत जाईल तेव्हा तिला ८००० रुपये मिळणार आहेत. 

५) आणि तिचे वयाचे १८  वर्ष पूर्ण झाल्यावर तिला ७५००० रुपये मिळणार आहेत. 

अशा प्रकारे लेक लाडकी या योजनेद्वारे मुलींना एकूण १ लाख १ हजार रुपये मिळणार आहेत. गरीब कुटुंबतीतील मुलींना सक्षम बनविण्याकरिता हि योजना राबवण्यात आली आहे . या आधी माझी कन्या भाग्यश्री योजना हि योजना देखील राबवण्यात आली होती . ती आता बंद करून १ एप्रिल २०२३ पासून लेक लाडकी योजना हि चालू करण्यात आलेली आहे.  आता आपण बघूया लेक लाडकी योजना या योजनेसाठी कोण पात्र आहेत. 

लेक लाडकी योजना पात्रता | Lek Ladki Yojana Eligibility

  • या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती हि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असायला हवी. 
  • १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेली प्रत्येक मुलगी या योजनेस पात्र आहे. 
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. 
  • जुळ्या मुली असतील तर त्या दोघी देखील या योजनेस पात्र आहेत. 

मुलींच्या शेक्षणिक विकासासाठी , राज्यातील मुलींचा मृत्यूदर कमी करणे, मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, मुलींच्या जन्मास प्रात्साहन देऊन राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे , बालविवाहास प्रतिबंध , मुलींचे कुपोषण होऊ नये या हेतूने महाराष्ट्र सरकारने या योजनेची अंमलबजावणी केलेली आहे.  

लेक लाडकी या योजनेमध्ये पिवळ्या व केशरी रॅशनकार्ड धारक कुटुंबाला या योजयोजनेचा लाभ घेता येईल . १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या १ अथवा  २ मुली  या योजनेस पात्र राहतील. तसेच १ मुलगा व एक मुलगी असेल तरी देखील त्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येईल. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जर जुळी अपत्ये जन्माला आली एक मुलगा आणि एक मुलगी किंवा दोन्ही मुली जरी असतील तर त्या दोन्ही मुलीदेखील या योजनेस पात्र आहेत. परंतु या योजनेसाठी आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य राहील. तसेच १ एप्रिल २०२३ पूर्वी जन्मलेल्या १ मुलगी किंवा १ मुलगा व त्यानंतर जन्मलेल्या १ मुलगी किंवा जुळ्या दोघी मुली देखील असतील तर त्या दोघीहि या योजनेसाठी पात्र राहतील. 

लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे । Lek Ladki Yojana 2023 Documents

१. लाभार्थीचा जन्माचे प्रमाणपत्र 

२. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखल- वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये पेक्षा जास्त नको. 

३. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ची छायांकित प्रत 

४. लाभार्थीचे व पालकाचे आधार कार्ड 

५. लाभार्थी शिक्षण घेत असल्याबाबबतचा संबंधित शाळेचा दाखला.

६. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आवश्यक राहील.  

७. शेवटच्या रकमेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी अविवाहित असणे आवश्यक .

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा | Lek Ladki Yojana Application

लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीच्या जन्माची नोंद संबंधीत आपल्या जवळच्या स्वराज्य संस्थेत करावी. त्यानंतर या  योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या अंगणवाडी सेविकेकडे योजनेचा लाभ घेण्या संदर्भात अर्ज दाखल करावा. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. या योजनेसाठी आवश्यक असलेले अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प , जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात देखील उपलब्द असतील .अंगणवाडी पर्यवेक्षक / मुख्यसेवीका यांच्याकडून सर्व कागदपत्रांची नीट पडताळणी होईल काही कागदपत्रे राहिल्यास १ महिन्याची मुदत देण्यात येईल. 

या योजनेची सखल माहिती घेण्यासाठी https://www.womenchild.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्या. 

आमचा हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की इतरांना share करा व या योजनेची माहिती जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या जास्त लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल.

Lek Ladki Yojana : FAQ

Q : लेक लाडकी योजना कधी सुरु करण्यात आली?

Ans : लेक लाडकी योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाकडून २०२३-२४ च्या बजेट मध्ये करण्यात आली.

Q : महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ कसा घेता येईल?

Ans : महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन.

Q : Lek Ladki Yojana 2023 Online apply करू शकतो का?

नाही, लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीच्या जन्माची नोंद संबंधीत आपल्या जवळच्या स्वराज्य संस्थेत करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!